सांगोला:येथिल फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची सांगोला ग्रामीण रुग्णालयास व दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देण्यात आली.
यावेळी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेविषयीची माहिती तसेच सर्व वार्ड बद्दलची सविस्तर माहिती घेण्यात आली.सदर उपस्थित विद्यार्थ्यांना आपण देखील आपल्या फार्मसी क्षेत्रात भविष्यात करत असलेली सेवा हि सदैव समाजउपयोगी व प्रामाणिकपणे केली पाहिजे असे यावेळी डॉ.साळुंखे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्येक्ष रुग्णालयाचे कामकाज कसे चालते याविषयी माहिती मिळाल्याचे समाधान वाटत आहे.
याबरोबरच दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला या ठिकाणी डॉ.बनसोडे यांच्याकडून हॉस्पिटलच्या कामकाजाविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी देण्यात आली. हि क्षेत्रभेट संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.संजय बैस यांच्या उपस्थितीत व्यवस्थित पार पडली. या क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा.सुरज मणेरी व प्रा.मिस.रिचा फराटे यांनी केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…