जमिनीच्या वादातून बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात दोघे जण जख्मी झाले.
जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा ताबा पोलिसांच्या पथकाने घेतला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मुद्रांक नोंदणी कार्यालयामध्ये शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात सतिश बबन क्षीरसागर (30, लक्ष्मण नगर, बीड), फारूक सिद्दीकी (28, जालना रोड, बीड) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या घटनेचे वृत्त शहरामध्ये वाऱ्यासारखे पसरले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधिक्षक संतोष वाळके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांनी घटनास्थळी धाव घेतली. दंगल नियंत्रण पथक दाखल झाले.
मुद्रांक आणि शुल्क कार्यालय परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. या घटनेचा तपास पोलीस प्रशासन करत आहे. अत्यंत गजबजलेल्या या ठिकाणी सकाळी अकरा वाजता गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…