सांगोला: येथिल फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शै. वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डी फार्मसी विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या उपस्थितीत पार पडला.
हा कार्यक्रम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व द्वितीय वर्षींतील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी फार्मसीचे दूरगामी होणारे फायदे सांगून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सर्फराज काझी सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व स्टाफ यांची ओळख करून देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग, प्रयोगशाळा, लायब्ररी, ऑफिस, इत्यादी विभागांची माहिती करून दिली. पूर्ण वर्षाचे शेड्युल यावेळी विद्यार्थांना सांगितले. या वेळी फणी गेम्स, गीत व नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली.मिस फ्रेशर म्हणून कु.साक्षी बालडे व मिस्टर फ्रेशर म्हणून चित्रक वाघमारे यांची निवड करण्यात आली. मा. प्राचार्य यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप प्रा. सुरज मणेरी यांनी केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…