ताज्याघडामोडी

१८ हजार पगार, ४ आलिशान घरं, २९ एकर जमीन, बँकेत लाखो रुपये

आर्थिक गुन्हे शाखेच्या उज्जैनमधील पथकानं देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरू झाली. या कारवाईदरम्यान कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला.

कन्नौदजवळील डोकाकुई गुडबेल गावात असलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या संचालकाच्या घरावर ईओडब्ल्यूच्या पथकानं धाड टाकली. प्राथमिक तपासाताच त्यांच्या हाती कोट्यवधींची संपत्ती लागली. विशेष म्हणजे व्यवस्थापकाचा पगार केवळ १८ हजार रुपये आहे.

काळ्या पैशाच्या माध्यमातून आरोपी गोविंद बागवाननं २९ एकर जमीन खरेदी केली. छापेमारीदरम्यान ईओडब्ल्यूच्या पथकाला चार घरांची माहिती मिळाली. या घरांची किंमत लाखोंमध्ये आहे. अतिशय आलिशान पद्धतीनं त्यांची बांधणी करण्यात आली आहे. १८ हजार रुपये पगारातून गोविंद बागवान यांनी इतकी मालमत्ता कशी काय उभारली असा प्रश्न पथकाला पडला आहे.

पत्नी आणि मुलाच्या नावावरदेखील बागवान यांनी बरीच संपत्ती ठेवली आहे. बागवानकडे २९ एकर जमीन आहे. तिची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते. यासोबतच सोन्या चांदीचे दागिनेही घरात सापडले आहेत. घरातून ईओडब्ल्यूच्या पथकाला रोख रक्कमदेखील सापडली आहे. बागवान यांची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. बागवाननं अनेक पॉलिसी काढल्या आहेत. त्याचीही कागदपत्रं घरात सापडली आहेत.

गोविंद बागवानच्या घरात खोटी कागदपत्रंदेखील सापडली आहेत. छापेमारी दरम्यान ईओडब्ल्यूच्या पथकानं घरातून बोगस पॅन कार्ड, मतदार ओळखपत्रं जप्त केली. या प्रकरणी बागवान विरोधात वेगळा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. ईओडब्ल्यूचे डीएसपी अजय कैथवास यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago