ताज्याघडामोडी

नवाब मलिकांना धक्का; कोर्टाने सुनावली ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ही कोठडी सुनावली.

नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी ईडीने मलिक यांची तब्बल सात तास चौकशी केली.

अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने आज बुधवारी मोठी कारवाई करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सात तासांच्या चौकशीनंतर अटक केली. ईडीने सकाळी ७ वाजता मलिक यांच्या घरी छापा टाकला होता.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या एफआयआरच्याआधारे सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दाऊदचा भाचा अलिशाह पारकर व छोटा शकीलचा माणूस सलीम फ्रुटच्या जबानीनुसार मलिक यांना अटक केल्याची ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली.

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला काश्मिरातील कारवायांसाठी आर्थिक पुरवठा करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएने दाऊदविरुद्ध बेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यासाठीचा पैसा हवालामार्फत मुंबईतून दाऊदपर्यंत किंवा दाऊदच्या सांगण्यावरुन मुंबईतून काश्मिरला पुरवला जात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

यांत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यानेच आता ‘एनआयए’ च्या एफआयआर आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गतच दाऊदची बहिण हसिना पारकरच्या बंद घरावर तसेच मुंबई व ठाण्यात मिळून दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता.

त्याअंतर्गतच अलिशाह पारकर, याची चौकशीही ईडीने केली होती. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित काही मालमत्ता कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने मलिक यांच्यावर ठेवला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago