ताज्याघडामोडी

नगरसेवकाच्या अंत्यसंस्कारावेळी सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला

शिवसेना नगरसेवक आकाश पाटील (३२) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू पाटील या भावांवर हल्ला केला.

हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना डाेंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उल्हासनगरमधील कैलास कॉलनी परिसरातील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांचे रात्री हृदयविकाराने निधन झाले. शेकडो जणांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी २.३० वाजता कॅम्प क्रमांक ५ येथील समतानगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

स्मशानभूमी परिसरातून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या एका हल्लेखोर टोळक्याने पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रसाद व बाबू या सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला केला.

या प्रकारामुळे तेथे उपस्थितीत नागरिकांची पळापळ झाली. काही नागरिकांनी हिंमत करून एका हल्लेखोराला पकडून हिललाइन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले, तर इतर हल्लेखोर रिक्षा तिथेच टाकून पळून गेले.

रिक्षासह तलवारी, चाॅपर जप्त

नागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोराची चाैकशी सुरू असल्याची माहिती पाेलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. हल्ल्यात जखमी झालेले सख्खे भाऊ असून, हल्लेखोर कैलास कॉलनी, जुने अंबरनाथ परिसरातील असल्याचा संशय आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस तपास करीत आहेत.

त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे मोहिते यांनी सांगितले. हल्ल्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये तलवारी, चॉपर आदी घातक शस्त्रे सापडली आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago