ताज्याघडामोडी

आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले

गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स बघून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहीत असतात.

पण गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी करण्याचा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय. या लेखकाने केलेले गुन्हेही साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून देतो असं सांगत बड्या बड्यांना फसवत असल्याचं समोर आलंय.

पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यवसायिकाला तब्बल साठ लाखांचा गंडा या लेखकाने घातल्यावर सायबर पोलिसांनी या कथित लेखकाला अटक केलीय. मात्र आता या सगळ्याची देखील एक कथा बनेल असं हा लेखक पोलिसांना सांगतोय. अनुप मनोरेची दोन अतिशय भिन्न रूपं आहेत. अगदी एखाद्या थरार कथेमध्ये शोभतील अशी.

त्याच्या पहिल्या रूपात तो मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिखाण करणारा एक लेखक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. हिंदी रंगभूमीवर त्यानं शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित रंग रसिया बालम या नाटकात काम केलंय.

एका यशस्वी कलाकाराचं चकचकीत आयुष्य तो जगत आलाय. मात्र याच अनुप मनोरेचं दुसरं रूप तेवढंच विदारक आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो असं सांगत तो हजारो लोकांना फसवत आलाय. त्यासाठी त्याने गणेश शेलार हे खोटं नाव धारण केलं होतं. फसवणुकीसाठी त्यानं निवडलेला मार्ग देखील शेरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्षीच्या कथेला साजेसा असाच आहे.

‘एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा’, ‘मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब’, ‘रोड टू हेवन’ अशा शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत असे आणि बडे मासे आपल्या जाळ्यात ओढत असे.

महिलेचं व्हर्च्युअल अकाऊंट तयार करायचा

सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी सांगतात की, एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा अशा प्रकरच्या जाहिराती हा आरोपी वृत्तपत्रांमध्ये करत असे. त्यासोबत तो मोबाईल नंबर देत असे. जाहिरात पाहून फोन करणाऱ्या पुरुषांना अनुप मनोरे हाय प्रोफाइल महिलांशी मिटिंग करून देतो असं सांगायचा.

त्यानंतर एखाद्या महिलेचं व्हर्च्युअल अकाऊंट तो तयार करायचा आणि त्यावरून समोरच्या पुरुषाशी तो संपर्क करायचा. यामार्फत येणारे पैसे स्वीकारण्यासाठी तो एखाद्या महिलेच्या नावावर असलेल्या बँक अकाउंटचा तो उपयोग करायचा . हे करताना त्या बँक अकाऊंटचे ए टी एम कार्ड तो स्वतः वापरायचा आणि अकाऊन्टमधून पैसे काढायचा.

वृत्तपत्रांमध्ये द्यायचा जाहिरात

अनुप मनोरेला फसवणुकीच्या या प्रकारची कल्पना त्याचा मित्र असलेल्या एका कथेतून सुचली असं त्यानं तपास करणाऱ्या पोलिसांना सांगितलंय. पण या कथेमध्ये अनुप पुढं स्वतःची भर घालत गेला. फसवणुकीचं हे जाळं विणताना त्यानं अनेक महिलांना त्याच्या सोबत घेतलं . त्यासाठी तो वृत्तपत्रांमध्ये “महिलांसाठी नोकरीची संधी” अशा शीर्षकाखाली जाहिरात द्यायचा.

ती जाहिरात बघून ज्या महिला त्याच्याशी संपर्क करायच्या त्या महिलांकडून तो त्यांची कागदपत्रं मागवून घ्यायचा आणि त्यांचा योपयोग करून बँकेमध्ये अकाऊंट ओपन करायचा. प्रत्येक अकाऊंटच्या बदल्यात त्या महिलांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यायचा आणि बाकी पैसे स्वतः वापरायचा.

ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरले जातायत ते एका महिलेच्या नावावर असल्याने पैसे भरणाऱ्या पुरुषाला आपण फसवले जातोय याचा संशय यायचा नाही. मागील दहा वर्षात कळत-नकळतपणे अनेक महिला आणि पुरुष अशाप्रकारे त्याच्या या कथेतील पात्र बनत गेल्या.

कथालेखनाचा हा प्रकार भयानक

कथालेखनाचे अनेक प्रकार मराठी साहित्यात प्रचलित आहेत. पण अनुप मनोरेने निवडलेला हा नवा प्रकार कोणी कल्पनाही करणार नाही असा आहे.अनुप मनोरे हा साधासुधा लेखक नाही तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्या आधारे लेखन करणारा लेखक आहे .या लेखनातूनच त्यानं ही अशी रंगीबेरंगी मायावी दुनिया उभारली. या दुनियेत प्रवेश हवा असेल तर या कथेतील पात्रांना लाखो रुपये मोजावे लागत होते.

गेल्या दहा वर्षांपासून तो ही कथा लिहीत होता जी आता त्याच्या अटकेपर्यंत पोहोचलीय . पण आता यातूनही आणखी एक कथा तयार होऊ शकेल असं तो पोलिसांना म्हणतोय. खरं तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन जे लिखाण केलं जातं ते अधिक कसदार, अधिक सकस मानलं जातं. पण त्यासाठी प्रत्यक्ष गुन्हे करण्याचा अनुभव घेतला जात असले तर कथालेखनाचा हा प्रकार भयानक म्हणावा लागेल.

फसवणुकीच्या कथेत अनेक महिलाही पुढे सहभागी

अनुप मनोरेच्या या फसवणुकीच्या कथेत अनेक महिलाही पुढे सहभागी होत गेल्या. त्यापैकी दीपाली शिंदे नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केलीय तर आणखी दोन महिलांचा शोध पोलीस घेतायत. पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यवसायिकानेदीपाली शिंदेने आपल्याला हाय प्रोफाइल महिलांशी संबंध निर्माण करून देतो असं सांगत वेगवगेळ्या बँक अकाउंटमध्ये साठ लाख रुपये जमा करायला लावल्याची तक्रार सायबर पोलिसांना दिली.

टेक्निकल अॅनॅलिसीस करून पोलिस दीपाली शिंदेपर्यंत पोहचले. मात्र तिने फसवणुकीच्या या रॅकेटचा मास्टरमाइंड आपण नसून गणेश शेलार असल्याचं सांगितलं. पोलीस या गणेश शेलार पर्यंत पोहचले. मात्र गणेश शेलार हाच अनुप मनोरे असल्याचं पुढं उघड झालं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

24 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago