वाडीकुरोली येथील शेतकरी तुकाराम धोंडीबा नाईकनवरे यांच्या शेतातील ऊस कल्याण उत्तम काळे रा-वाडी कुरोली ता पंढरपुर यानेच मुद्दाम खोडसाळपणाने आमचे अर्थीक नुकसान व्हावे ह्या उद्देशाने सदरचा ऊस पेटवुन दिलेला आहे अशा आशयाची फिर्याद वाडीकुरोली येथील शेतकरी तुकाराम नाईकनवरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादी नुसार फिर्यादी तुकाराम धोंडिबा नाईकनवरे हे आई सुशिला,पत्नी जयश्री, व एक मुलगा व भाऊ सुभाष ,व भावजय असे वाडीकुरोली येथील शेतात घर करून एकत्रात राहणेस असुन शेती व्यवसाय करून कुंटुबांची उपजिविका भागवतात. दिनांक 20/02/2022रोजी रात्रौ 10/30वा.चे सुमारास फिर्यादी व त्याचे कुटूंबीय हे घरामध्ये टीव्ही पहात असताना शेजारचे ज्ञानेश्वर मच्छींद्र नाईकनवरे यांनी फिर्यादीस घरी येऊन तुमच्या शेतातील ऊस पेटलेला आहे असे सांगितले.यावेळी फिर्यादीसह सर्वजण घरा शेजारचे 1)सुधीर सर्जेराव नाईकनवरे 2)धंनजय बाळु नाईकनवरे 3)राहुल सर्जेराव नाईकनवरे याना सोबत घेत ऊस पेटलेल्या शेतात पळत पळत गेले.
सदरचा ऊस हा वाडीकुरोली जमीन गट नंबर 114मध्ये असुन सदर गटातील सुमारे अर्धा एकर ऊस जळालेला आहे सदरचा ऊस हा शेतीच्या दक्षिण बाजुपासुन उत्तर साईटला सुमारे पाचशे फुट अंतरावर मध्यठिकाणी ऊस जळला आहे. सदरचा ऊस हा फिर्यादीच्या वस्तीवरील राहणारे कल्याण उत्तम काळे यांनी पेटवलेला असावा कारण फिर्यादीचे व त्याचे 5वर्षापुर्वी भांडण झाले होते त्या भांडणामध्ये तुझा ऊस पेटवुन देतो अशी धमकी कल्याण काळे यांनी फिर्यादीस दिली होती. त्याने आमचा ऊस मागचे वर्षीही फिर्यादीचा ऊस पेटवला होता त्यावेळी पोलीस स्टेशनाला तक्रार दिली नव्हती.
5महिन्यापुर्वी अनिता सुधीर नाईकनवरे हिच्याजवळ त्यांचे काहीतरी अर्थिक नुकसान करतो असे कल्याण काळे हा म्हणाला होता .सदरचा ऊस हा चालु गळीता करीता जाणारा सुमारे 15 ते 16 फुट उंचीचा असा ऊस कल्याण उत्तम काळे रा-वाडी कुरोली ता पंढरपुर यानेच मुद्दाम खोडसाळपणाने अर्थीक नुकसान व्हावे ह्या उद्देशाने सदरचा ऊस पेटवुन दिलेला आहे अशी फिर्याद तुकाराम नाईकनवरे यांनी दाखल केली आहे.