ताज्याघडामोडी

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संगीता तुपसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे याच्या विरुद्धही पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

मानलेल्या आईच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील अंबाजोगाईत या प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संगीता तपसागर ह्या पीडितेची मानलेली सासू आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago