डीपीचा शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणचा अभियंता आणि लाईनमनवर गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील गेवराई येथे ही घटना घडली आहे. अभियंते शिवरत्न पंडित आणि लाईटमन जयदीप ढगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सावरगाव येथील वस्ती शेजारी असलेला डीपी हा उघड्यावर लाईटच्या खांबाला लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या डीपी मधून तारा बाहेर लोंबकळत होत्या. याची नागरिकांनी अनेक वेळा महावितरणकडे तक्रार केली होती.
मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 30 नोव्हेंबर 2021 रोजी दत्तात्रय जाधवर यांचा या डीपीला धक्का लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
दत्तात्रय जाधवर यांच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी महावितरणविरुद्ध संताप व्यक्त केला होता. अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगूनही मादळमोही येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या उघड्यावर असलेल्या डीपी संदर्भात तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत आणि त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
याबरोबरच आसाराम जाधवर यांनी या मृत्यूला महावितरणला जबाबदार धरावे अशी तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आसाराम जाधवर यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, सावरगाव मधील रस्त्यालगत सिंगल फेज डीपी आहे. या डीपीच्या उघड्या पडलेल्या तारांमुळे मनुष्य आणि प्राण्यांच्या जिविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी मादळमोही येथील महावितरणचा अभियंता पंडित आणि लाईनम जयदीप सखाराम ढगे यांना सूचित केले होते.
मात्र, त्यांनी ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही. डीपीजवळून जाणारे दत्तात्रय अण्णासाहेब जाधवर यांचा उघड्या तारांना स्पर्श झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गेवराई पोलिसांनी महावितरण कार्यालयाकडे विद्यूत निरीक्षकांचा अभिप्राय मागवला होता आणि महावितरणकडून यासंदर्भात अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचे यातून पुढे आले होते.
याच आधारावर गेवराई पोलिसांनी दोघांवर कलम 304 अन्वये गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…