ताज्याघडामोडी

माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

अहमदनगरमधल्या राहुलीत भरदिवसा माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. 

राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय परिसरात भिलहाटी इथं गावठी कट्ट्यातुन गोळीबार करण्यात आला. या घटनेत सोनाली बर्डे थोडक्यात बचावल्या, त्यांच्या हाताला गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राहुरी पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं आहे.

नेमकी घटना काय? 

नगर जिल्ह्यातील राहुरी शहर हद्दीतील ग्रामीण रुग्णालय परिसरात अससेल्या भिलहाटी इथं गेल्या काही दिवसांपासून पवार आणि माळी या दोन गटांत काही कारणांवरून वाद सुरू होते. काही वेळा तुरळक हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पण आज दुपारी या वादाला उग्र स्वरूप प्राप्त झालं. 

पवार आणि माळी या दोन गटांत वाद उफाळून आला. या वादातून राहुरी नगरपरिषद च्या माजी नगरसेवीका सोनाली बर्डे यांच्यावर गावठी कट्ट्यातुन गोळीबार झाला. नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत त्या थोडक्यात बचावल्या आहेत. गोळी त्यांच्या हाताला लागली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोन ते तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago