मनोहर महादेवराव बांते (५३) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी खरबी येथे बांते यांच्या भाचीचे लग्न होते.
यासाठी बांते कुटुंबीय लग्नाला गेले. मनोहर घरीच होते. भाऊ शरद बांते यांनी मनोहर यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सुपर बाजारमधील कर्मचाऱ्याला फोन करून घरी जाण्यास सांगितले. कर्मचारी घरी गेला. दार बंद होते.त्याने आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचाऱ्याने शरद यांना याबाबत सांगितले.
शरद हे अन्य नातेवाइकांसह घरी आले. दार तोडले असता मनोहर पंख्याला गळफास घेतलेले दिसले.रामेश्वरीतील बांते सुपर बाजारच्या संचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हावरापेठ येथे घडकीस आली.
दरम्यान, नातेवाइकांनी गळफास काढून मनोहर यांना मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनेचे वृत्त कळताच लग्नस्थळी शोककळा पसरली. नातेवाइकांनी त्यांचे घर गाठले. मनोहर यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मनोहर यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नुकतेच जुळले मुलीचे लग्न
मनोहर बांते यांच्यामागे पत्नी रसिका, मुलगी तनुश्री, मुलगा अथर्व व मोठा आप्तपरिवार आहे. अथर्व हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. नुकतेच मनोहर यांच्या मुलीचे लग्न जुळले. २० मार्चला साक्षगंध व मे महिन्यात लग्न करण्याची तयारी नातेवाइकांनी केली होती.
मात्र, त्यापूर्वी ही धक्कादायक घटना घडली. मनोहर यांच्या आत्महत्येमुळे बांते कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. मनोहर हे नगरसेविका विशाखा बांते यांचे दीर तर माजी नगरसेवक शरद बांते यांचे ते भाऊ होत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…