वेळापूर, ता. माळशिरस येथे पैशासाठी शेत मजुराची निर्घुण हत्या करण्यात आल्या असून या बाबतीत आज वेळापूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भालचंद्र पोपट वाघ वय 38 वर्षे , रा . पिसेवाडी , ता . माळशिरस हे मयत झाले आहेत.
वेळापूर पोलिसांत मयताचे वडील पोपट काशिनाथ वाघ, रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार त्यांचा नातू किशोर भालचंद्र वाघ याने सांगीतले की , काल दि . 15.2.2022 रोजी रात्री 9.30 वा . चे सुमा . गणेश पाटील रा . चव्हाणवाडी व रामकृष्ण शिवाजी बाघमोडे रा . पिसेवाडी यांनी त्याला व मयत वडील भालचंद्र पोपट वाघ यांना वेळापूर येथील निमगाव रोडजवळील पुलावरून वेळापूर येथील रिच कलेक्शन या कपड्याच्या दुकानात मो . सायकलवरून आणले . तेथे शिवाजी गायकवाड रा . खंडाळी , ता . माळशिरस हा माझ्या वडीलांना म्हणाला तू दोन दिवस कामाला का आला नाही , तू उचल घेतलेली राहिले पैसे आत्तात्या आत्ता दे असे म्हणु लागला त्यावेळी वडील त्यांना मी उद्यापासून तुमच्याकडे कामाला येते असे म्हणाले असता तेथे उभा असलेला राहुल माधवराव माने देशमुख रा . शेरी नं . 1 वेळापूर याचे सांगणेवरून शिवाजी विजय
गायकवाड व रामकृष्ण शिवाजी वाघमोडे यांनी प्लास्टीक पाईपने भालचंद्र वाघ यांना हातावर , पायावर , पाठीवर मारहाण करू
लागले . त्यावेळी शिवाजी गायकवाड यांनी मला तेथुन जाण्यास मी घाबरून तेथुन घरी आलो . असे माझा नातू किशोर याने मला सांगीतले . त्यावेळी आमची खात्री झाली की मुलगा भालचंद्र पोपट वाघ यास 1 ) शिवाजी विजय गायकवाड रा . खंडाळी 2 ) गणेश पाटील रा . चव्हाणवाडी 3 ) रामकृष्ण शिवाजी वाघमोडे रॉ . पिसेवाडी 4 ) राहुल माधवराव माने देशमुख रा . शेरी नं . 1 वेळापूर यांनी मिळुन शेतमजुरीचे उचलीचे घेतलेले पैसे घेवूनही कामाला का आला नाही या कारणावरून प्लास्टीक पाईपने मारूण गंभिर जखमी करून जिवे ठार मारले आहे .
सदर फिर्यादीवरून 1 ) शिवाजी विजय गायकवाड रा . खंडाळी 2 ) गणेश पाटील रा . चव्हाणवाडी 3 ) रामकृष्ण शिवाजी वाघमोडे रा . पिसेवाडी 4 ) राहुल माधवराव माने देशमुख रा . शेरी नं . 1 वेळापूर यांचेवर वेळापूर पोलिसांत भादवि 302, 364, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…