दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी आतंकवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्यूमुखी पडले होते.
या घटनेनंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची रेकी केल्याची कबुली दिली आहे.
दहशतवाद्यांच्या कटाची माहिती समोर येताच शिर्डीत खळबळ उडाली असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी असं अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं असून ते दुबईतून भारतात आले होते.
त्यांनी घातपात घडवण्यासाठी शिर्डी येथील साईबाबा मंदिराची रेकी केली होती. संबंधित सर्व दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे.
यासोबतच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी एका हिंदी चॅनेलच्या संपादकाच्या शिर्डीतील घराची देखील रेकी केली होती. गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने कारवाई करत संबंधित तिन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटक पदार्थ आढळून आले आहेत. या प्रकरणी एटीएसने आतापर्यंत एकूण आठजणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…