ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपचे मोठे षडयंत्र

https://fb.watch/bbjR5jhXGf/

भाजपचे काही प्रमुख लोक २० दिवसांपूर्वी मला दिल्लीत भेटले होते. यावेळी त्यांनी मला तुम्ही महाविकासआघाडी सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगिले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सरकार पाडणार आहोत. आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी आम्ही एकतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणू किंवा काही आमदार फोडू. त्यामुळे तुम्ही महाविकासआघाडी सरकार वाचवण्याच्या फंदात पडू नका. अन्यथा केंद्रीय यंत्रणा तुम्हाला ‘टाईट’ करतील, अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी मला दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. ते मंगळवारी शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जायला तयार आहे. महाविकासआघाडी सरकारकडे १७० आमदार आहेत. त्यामुळे तुम्ही लोकशाहीचे संकेत पायदळी कसे तुडवू शकता, असा सवाल मी भाजप नेत्यांना विचारला. महाराष्ट्रातील सरकार पाडायचा प्रयत्न केलात तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. पण भाजपचे नेते म्हणाले की, असे काहीही होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दल आणून सर्व थंड करू, असे त्यांनी म्हटले. त्यानंतरही मी सरकार पाडण्याच्या कटात सहभागी होण्यास नकार दिला. यानंतर तिसऱ्याच दिवशी माझे मित्र आणि निकटवर्तीयांवर धाडी पडायला सुरुवात झाली. पण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कधी गुडघे टेकायला शिकवले नाही. त्यामुळे तुम्ही काहीही करा हे सरकार पडणार नाही, असे मी भाजपच्या नेत्यांना सांगितले. त्यानंतर सातत्याने माझ्या कुटुंबीयांना आणि निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला

आजची पत्रकारपरिषद ही मी ईडीच्या कार्यालयाबाहेरच घेणार होतो. महाराष्ट्रात आता तुम्ही की आम्ही, कोण राहतंय ते पाहू. बाहेरचे लोक येऊन आमच्यावर दादागिरी करणार. आमच्या बायका-मुलींकडे बघणार. यावर भाजपवाले टाळ्या वाजवणार. हे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago