सांगोला: कॅम्पस प्लेसमेंट बाबतीत अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून तिला वार्षिक 4.5 लाख रुपयाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे यांनी दिली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही शेअर मार्केट डेरीवेटिव मधील जागतिक स्तरावर एक नंबर आणि इक्विटी मध्ये 4 नंबर क्रमांकावर आहे , त्यामुळे अशा नामांकित कंपनीमध्ये फॅबटेक कॉलेज मधील विद्यार्थ्यांना संधी मिळणे हे फॅबटेक मधील तंत्र शिक्षणाची गुणवत्ता दर्शवते असे संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रूपनर यांनी सांगितले.
निवड झालेल्या या विद्यार्थ्याचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडेमिक डीन प्रा . तात्यासाहेब जगताप, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेली कम्युनिकेशनच्या विभागप्रमुख प्राध्यपिका धनश्री राऊत, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ .साहेबागौडा संगनगौडर, सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…