गुन्हे विश्व

प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले, नंतर मुलानेच केली आत्महत्या

प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही थरारक घटना भिवापूर परिसरात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी उघडकीस आली. या घटनेने पोलिस व रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. चरण (वय ५५), असे मृताचे; तर स्वर्णिमा (वय ३७, दोघांचीही नावे बदललेली), असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण हा शेती करीत असून तो स्वर्णिमावर एकतर्फी प्रेम करायचा. काही दिवसांपूर्वी स्वर्णिमाला संशय आल्याने तिने चरणसोबत बोलणे बंद केले. त्यामुळे चरण संतापला. रविवारी दुपारी आरी आणण्याच्या बहाण्याने चरण हा स्वर्णिमाच्या घरी गेला. त्याने तिला आरी मागितली.

स्वर्णिमा ही आरी आणण्यासाठी खोलीत गेली असता चरणही तिच्या मागे गेला. त्याने तिच्या पोटावर तसेच मानेवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. ‘मला का मारत आहे’, अशी विचारणा स्वर्णिमाने केली. त्यावर ‘तू माझ्याशी बोलत नाही, तुला जिवानिशी ठार मारल्याशिवाय सोडणार नाही’, असे म्हणत त्याने पुन्हा तिच्यावर चाकूने वार केले. स्वर्णिमाने आरडा-ओरड करताच चरण तेथून पळून गेला.

शेजाऱ्यांनी धाव घेतली. जखमीला जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भिवापूरचे ठाणेदार महेश भोरटेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अन् मुलासमोरच घेतले विष!

स्वर्णिमावर वार करून चरण पसार झाला. पोलिसांसह त्याच्या मुलाने चरणचा शोध सुरू केला. सोमवारी सकाळी चरण हा अड्याळ परिसरातील शेतात असल्याची माहिती मुलाला मिळाली. मुलगा व त्याचे दोन मित्र तेथे गेले. मुलाला बघताच चरण पळायला लागला. ‘बाबा पळू नका, थांबा’, असे मुलगा म्हणाला.मुलगा त्याच्याजवळ गेला.

यावेळी चरणच्या हातात विषाची बाटली होती. ‘बाबा तुम्ही हे काय केले’, असे मुलगा चरणला म्हणाला. ‘मी चुकीचे कृत्य केले. माझी बदनामी झाली, माझी मुलगी मला माफ करणार नाही’ असे म्हणत चरणने बाटलीचे झाकण उघडून विष प्राशन केले. मुलाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून चरणला मृत घोषित केले.

याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago