चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील 27 वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या 2 चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नगरदेवळा रेल्वेस्थानकावर घडली.
जितेंद्र दिलीप जाधव (रा. बोरखेडा ता. चाळीसगाव), चिराग जाधव (6) आणि खुशी जाधव (4) अशी मृतांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीस गाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसह रहात होता. चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टॉवर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणून काम करत होता.
जाधव पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून पूजा हिने तिचा भाऊ भूषण, काका सुधाकर व काकू यांना चाळीसगाव यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पूजा ही भाऊ, काका आणि काकुंसोबत माहेरी निघून गेली आणि जितेंद्र हा दोघ मुलांसोबत बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता.
रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला. बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर त्याने मुलांना पाववडे खाऊ घातले. त्यानंतर ते दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांना शंका आल्याने त्यांचा शोध घेणे सुरू केले. अखेर नगरदेवळा रेल्वेस्थानकावर जवळ तिघांचे मृतदेह दिसून आला. सचखंड एक्सप्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्याने घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रविण वाघ यांनी पंचनामा केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसात अत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…