सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रदर्शन स्पर्धेकरिता राज्यभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे फार्मसी पदवीकरिताचे विषय हर्बल इंडस्ट्री : प्रेझेंट स्टेटस अँड फिवचर प्रॉस्पेक्ट आणि फार्माकोव्हिजिलन्स होते. तर फार्मसी पदविका करिताचे विषय हे फार्मासिस्ट रोल इन कोविड स्विचवेशन आणि इफेक्टिव्हनेस ऑफ ऑनलाईन टिचिंग इन प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होते. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने यशस्वी रित्या पार पडले.
या राज्यस्तरीय इ-स्टर प्रदर्शन स्पर्धेकरिता पदविका शाखेमधून ७३ व पदवी शाखेमधून ११६ स्पर्धक सहभागी झाले होते. पदविका शाखेमधून प्रथम क्रमांक प्रगती विष्णू शेळके राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव इस्लामपूर, द्वितीय क्रमांक सुप्रिया आप्पासो काशीद फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला तर पदवी शाखेतून प्रथम क्रमांक आकांशा बाळासाहेब शिंदे स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर, द्वितीय क्रमांक पूजा खर्जुले लोकमान्य टिळक इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी,खारघर नवी मुंबई या विद्यार्थिनींनी पटकावला. प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी दोन हजार तर द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.याबरोबरच सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे सहसंयोजक म्हणून प्रा. अमोल पोरे तर समन्वयक म्हणून प्रा. सर्फराज काझी यांनी काम पहिले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…