आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. मागील महिन्यात कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिल्यानंतर मालेगावमध्ये कॉंग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्याची आज कॉंग्रेसने राष्ट्रवादीला परतफेड केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेला खिंडार पाडून महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे मंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादीकडे असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तर नांदेड, औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांचा तसेच, भाजपच्याही कार्यकर्त्यांचाही कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत पक्षप्रवेशांची चढाओढ दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेतील सर्व कॉंग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
परभणी, औरंगादाबाद, नांदेड येथे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडून आज मोठ्या संख्येने महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परभणीतल्या जिंतुर आणि सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…