उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रचारसभांच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना राज्यात भाजप नेत्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या हेतूने भाजप नेत्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
नोएडा पोलीस उपायुक्त (झोन III) अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील मिर्झापूरमध्ये ९ फेब्रुवारीला भाजप बुथ अध्यक्ष वीरपाल यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तीन दिवसात या प्रकरणाचा छडा लावत या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
भाजप नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी नेत्याच्या पत्नी आणि प्रियकरासह आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृताची ओळख मिटवण्यासाठी हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीरपाल यांच्या पत्नी नेहाचे गेल्या तीन वर्षांपासून मुकेश उर्फ सोनूसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून वीरपालचा काटा काढायचा होता. याच दरम्यान नेहाला समजले की, वीरपालला यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात एक कोटी रुपये आणि प्लॉट मिळणार आहे. या पैशाच्या आणि जमिनीच्या लालसेपोटी वीरपालच्या हत्येचा कट रचला गेला.
वीरपालची हत्या करण्यासाठी नेहा आणि मुकेशने या कटात त्यांच्या दोन मित्रांनाही सहभागी करुन घेत ५० हजार रुपये दिले होते. ९ फेब्रुवारीच्या रात्री नेहा आणि मुकेशने वीरपालला मारण्यासाठी राजकुमार आणि भूदेव शर्मा यांना 50 हजार रुपये दिले.
या चौघांनी वीरपालची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. मृतदेहावर रजाई टाकून आरोपी पळून गेले. वीरपाल आणि नेहा यांचे २००८ मध्ये लग्न झाले होते. त्यांना 13, 11 आणि 7 वर्षांची तीन मुले आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. तेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…