ताज्याघडामोडी

मास्क मुक्त महाराष्ट्राबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अशातच जनतेतून मास्कमुक्त महाराष्ट्र होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोल्हापुरात बोलताना राजेश टोपे यांनी म्हटले की, पाश्चिमात्य देशांनी मास्कची सक्ती काढून टाकली आहे. हे का केले आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या टास्क फोर्सला अशी विचारणा करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले की, आता निर्बंध वाढवण्याचे काहीही कारण नाही. आता निर्बंध कमीच केले जातील. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तसा विश्वास दिला आहे. आजच महाराष्ट्र मास्क मुक्त केला पाहिजे, असे अजिबात नाही. पण ज्यांनी मास्क मुक्त केले त्यांचे शास्त्र काय याचा अभ्यास करत आहोत. तूर्तास मास्क मुक्तीचा विषय नसल्याचेही टोपे म्हणाले.

दरम्यान टोपे पंतप्रधान मोदी यांच्या आरोपांबाबत बोलताना म्हणाले की, कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी तर यासाठी तिजोरी रिकामी केली. कोरोना पेशंटला प्राधान्य दिले. अनेक चांगल्या संस्थानी राज्याचे कौतुक केले. आम्ही आमच्या परीने जमेल तेवढे काम केल्याचे ते म्हणाले.

टोपे यावेळी लसी वाया जात असल्याच्या संदर्भात म्हणाले की, अनेक हॉस्पिटल्सनी पुढे येऊन लस खरेदी केली. आता लस एक्सपायरी होत असल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मोठ्या कंपन्यांनी या लसी घ्याव्यात. त्यांची लस आधी घ्यावी आणि त्यांना दुसऱ्या द्याव्यात याबाबत सुद्धा केंद्राशी आणि राज्याशी बोलेन, असे टोपे म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago