जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळला. शेवटी त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा उपचारदरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला. तर पत्नीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
पतीचा मृत्यू झाल्याने परिवार उघड्यावर आलंय. त्यामुळं आर्थिक मदतीची मागणी केली जातं आहे. अर्चना राजेंद्र चरडे यांनी आणि यांचे पती राजेंद्र चरडे यांनी 9 जानेवारीला संध्याकाळी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनी विष घेतल्याची माहिती मिळताच त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पती-पत्नी दोघांवर उपचार करण्यात आले. यात काही दिवसांत पत्नीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र घटनेच्या एका महिन्यानंतरया पती राजेंद्र चरडे यांची प्राणज्योत मावळली.
दोन मुलींना कसं सांभाळणार?
राजेंद्रकडे केवळ दोन एकर शेती आहे. दोन लहान मुली असल्याची माहिती मृतक शेतकऱ्याची पत्नी अर्चना राजेंद्र चरडे यांनी दिली. राजेंद्र यांच्यावर सेवाग्राम येथील सेंट्रल बँकेचे 70 हजार रुपयांचे कर्ज होते. सोबतच त्यांनी इतर लोकांकडून कर्ज घेतल्याची माहिती आहे. तर पत्नी हिच्या नावाने सुद्धा उमेदच्या गटातून कर्ज काढलेले आहे. शेतीतून होणारे उत्पन्न आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून राजेंद्रने आत्महत्या केल्याची माहिती मृतकाचा भाऊ नरेश चरडे यांनी दिली.
सरकारी योजना कागदावरचं
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या जातात. मात्र या योजनाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळताना दिसत नाही. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली जातं आहे. शेतकरी आत्महत्या होतात. पण, सरकारी निकष पूर्ण करणं बरेचदा कठीण जातं. कागदपत्रांच्या अभावी काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नसल्याचं चित्र आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळं आर्थिक मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…