माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम केल्याने सर्वञ रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कार केल्याने थोड्या वेळात पुरेसा शरीराला व्यायाम मिळतो. दैनंदिन जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी सूर्यनमस्कार करणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कार मुळे सर्वांगसुंदर व्यायाम होऊन आत्मिक, मानसिक व शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते. स्वतःच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार जीवनात आवश्यक असल्याचे मत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी “आझादी का अमृतमहोत्सव” या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात बुधवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी “आझादी का अमृतमहोत्सव” हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार हा कार्यक्रम घेण्यात आला.
या मध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग सहभागी झाला होता. पंढरपूर सिंहगड महाविद्यालय, “राष्ट्रीय सेवा योजना” वतीने स्वस्थ भारत, आयुषमान भारत, आरोग्य भारत हा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…