सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची तपासणी वैधमापन पथका कडून अचानकपणे केली जात आहे. आज मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स च्या ६० टनी वजन काटयांची तपासणी वैधमापन विभागाकडून अचानकपणे करण्यात आली. युटोपियन शुगर्स चा वजन काटा हा तंतोतंत व बरोबर असल्याचा अहवाल दिला आहे.
युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादक शेतकरी यांचा गेल्या 7 वर्षांपासून विश्वास संपादन केल्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा कारखाना अशी कारखान्याची ओळख झालेली आहे.या विश्वासास कोणत्याही प्रकारे तडा बसू नये याची पुरेपूर काळजी युटोपियन प्रशासन नेहमीच घेत असते.अचानकपणे तपासणी केलेल्या वजन काट्यात कोणत्याही प्रकारचा फरक नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.सदर च्या पथकामध्ये निरीक्षक, वैधमापन शास्त्र सोलापूर-4 विभाग सोलापूर व निरीक्षक, वैधमापन शास्त्र सांगोला शाखेचे पी. एच. मगर साहेब, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र सोलापूर अ.ध. गेटमे साहेब. शेतकरी प्रतिंनिधी आदी उपस्थित होते.
युटोपियन शुगर्स हा परिचारक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा कारखाना असून आज पर्यंत कारखान्याने शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. व राबवित आहोत. भविष्यात ही शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी वेगवेगळे प्रयोग राबविणार असून आज वैधमापन विभागाकडून अचानक झालेल्या तपासणी मध्ये कोणताही दोष आढळून न आल्याने ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.अशी प्रतिक्रिया युटोपियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी दिली आहे.