सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या 20 व्या पुण्य्‍तिथी निमित्त् कारखाना कार्यस्थळावर भजन कीर्तन संपन्न

 

सहकार शिरोमणी वसंतराव(दादा) काळे यांच्या 20 व्या पुण्य्‍तिथीनिमित्त्‍ कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातुन कारखाना कार्यस्थळावर स्व्. दादांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस बळीराम(काका) साठे व कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे व संचालक मंडळ यांनी पुष्पचक्र् वाहुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी ह.भ.प.मच्छिंद्र कावडे महाराज, सुपली यांनी श्रीविठ्ठल व दादांच्या प्रतिमेचे पुजन करुन किर्तन सुरु केले.

तसेच किर्तनास मौजे उपरी, पळशी, सुपली, भाळवणी, गार्डी, वाडीकुरोली, पि.कुरोली, धोंडेवाडी, केसकरवाडी, भंडीशेगांव इ. गावचे भजनी मंडळ यांनी साद दिली. तसेच दु.12.00 वा. पुष्पवृष्टी करुन, कार्यक्रम संपन्न्‍ झाला

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बळीराम(काका) साठे यांनी अध्यक्षीय भाषणात राजकारणात घाई करुन चालत नाही, यावृत्तीने कार्य करणारे काळे साहेब यांना मोठेपणाने कडेवर घेवुन जाणार आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या योग्य्‍नियोजनामुळे सहकार चळवळ टिकुन राहिली आहे. कारखानदारी उभारीस आली आहे. आपण अशीच समाजसेवा करीत रहा तुमची स्वप्ने लवकरच पुर्ण होतील असे सांगुन, आमचे सदैव तुम्हांस सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. तसेच धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मनोगतात दादावर असलेले प्रेम व्यक्त्‍केले.

सदर प्रसंगी चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले कोणतीही राजकीय ताकद नसताना सामन्य्‍कुटुंबात जन्माला येवुन भाळवणीच्या या माळराणावर स्व्.दादांनी भागातील ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी ही संस्था उभारली असून, स्व्. दादांचे आचार विचार सर्व घटकापर्यत पोहचले पाहिजेत या हेतुने स्व्.दादांच्या जयंती व पुण्य्‍तिथी निमित्त्‍दर वर्षी कारखाना कार्यस्थळावर अखंड हरिनाम सप्ताह, कथा, किर्तन, मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा, कुस्ती, विविध वकृत्व्‍स्पर्धा, रक्तदान शिबीर, सर्वरोग निदान शिबीर अशा सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सदरचे कार्यक्रम घेता आले नसल्याचे सांगुन स्व्.दादांच्या आर्शिवादाने आणि आपणा सर्वांचे सहकार्याने आपण आज 3,03,333 व्या साखर पोत्याचे पुजन केले. सन 2021-22 गळीत हंगाम चालु करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, सहकार मंत्री बाळासाहेब पाटीलसाहेब यांनी मोलाचे सहकार्य करुन, आपले कारखान्यास शासन हमी देण्यात आली. त्यामुळे सध्या सिझन सुरळीत चाल असून, 5 लाख मे.टन गाळप करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट् आहे. चालु व येणारे सर्व सिझन आपले सर्वाचे सहकार्याने यशस्वी करुन जिल्ह्यात एक नंबरवर आपला कारखाना येईल यासाठी सतत प्रयत्न्‍करु असे सांगितले. यावेळी उपस्थितांचे आभार कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी मानले.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देवानंद गुंड-पाटील, डीव्हीपी उद्योग समुह व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी पंढरपूर शहराध्यक्ष सुधिर भोसले, महिला तालुकाध्यक्षा राजेश्रीताई ताड, राष्ट्रवादीचे सरचिटनीस दत्तात्रय माने, राष्ट्रवादी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष मारुती पोरे, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधिर धुमाळ, नगरसेवक प्रशांत शिंदे, फारक बागवान, महादेव धोत्रे, धनंजर कोताळकर, सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष धनाजी देशमुख, मर्दाशेठ, वाडीकुरोलीचे वसंत महाराज कौलगे, विठ्ठल

कारखान्याचे संचालक समाधान काळे, मिस्टर संचालक महादेव देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, निशिगंधा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आर.बी.जाधव, कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे,मा.व्हा.चेअरमन मारुती भोसले, मिस्टर संचालक अरुण बागल, संचालिका मालन काळे, संचालक सर्व श्री मोहन नागटिळक, गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभीषण पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील,

दिनकर कदम, दिनकर चव्हाण, तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदिप निर्मळ, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर,नागेश फाटे, माजी संचालक राजसिंह माने, संभाजी बागल, तानाजी जाधव, इस्माईल मुलाणी, स्व्. दादांच्या कथा, व्यथा व गाथा सर्व मिडावर प्रसारीत करणारे शरद जाधव, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, डिस्टीलरी मॅनेजर पी.डी.घोगरे, टेक्निकल जनरल मॅनेजर प्रकाश तुपे, प्रोडक्श्न मॅनेजर एन.एम.कुंभार, फायनान्स्‍मॅनेजर आर.व्ही.घुले, मुख्य शेती अधिकारी अे.व्ही.गुळमकर, चिफ अकौंटंट बबन सोनवले, नवनाथ कौलगे को-जन मॅनेजर एस.बी.डुबल, अमित गाजरे, प्रशासन/लिगल ज्ञानेश्वर कुंभार, अधिकारी कर्मचार व ऊस उत्पादक शेतकरी, भाविक, ऊस तोडणी वाहतुकदार, तोडणीमजुर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago