परिस्थितीचे चटके सहन करत शेवटच्या श्वासापर्यंत लोककल्याणासाठी झटलेला लोकनेता सहकार शिरोमणी वसंतराव काळे होते असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब साळुंखे यांनी केले ते वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली ता. पंढरपूर येथे आयोजित वसंतदादा काळे यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामकृष्ण वीर महाराज होते यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे व्हा. चेअरमन राजेंद्र शिंदे राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे विठ्ठलचे संचालक महादेव देठे उत्तम नाईकनवरे निशिगंधा बँकेचे व्हा. चेअरमन राजेंद्र जाधव यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे प्रतिभाचे चेअरमन विष्णू यलमार मारुती भोसले गंगाधर गायकवाड बिभीषण पवार सुधाकर कवडे युवा गर्जनेचे संस्थापक समाधान काळे डॉ.सुधीर शिनगारे संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कौलगे संचालक दिनकर चव्हाण चंद्रकांत पाटील कांतीलाल काळे महादेव नाईकनवरे व सहकार शिरोमणी परिवारातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की सहकार अर्थकारण शिक्षण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गाव खेड्यातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी वसंतदादा काळे यांनी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभा केले आज पूर्वीची गावखेड्यातील लोकसंस्कृती आणि ग्रामसंस्कृती मधील आनंद आता लोप पावत चालला आहे तो जतन करणे काळाची गरज आहे. दादांच्या जीवनचरित्रातून प्रबळइच्छाशक्ती आणि आत्मविश्वास हे गुण घेऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनीपुढील वाटचाल करावी असे सांगितले . अध्यक्षस्थानावरून बोलताना रामकृष्ण वीर महाराज म्हणाले की जीवन जगत असताना अनेक संकटाचा सामना करून दीपस्तंभासारखा आदर्श वसंतदादांनी आपल्या कार्यातून उभा केला तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी सांगितले की सहकार शिरोमणी वसंत दादा ने ज्या ज्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले होते त्या क्षेत्राशी संबंधित सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबून दादांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले जाते. काम करण्याची तयारी असेल तर विद्यार्थ्यांना निश्चित ध्येयापर्यंत पोहोचता येते यासाठी ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी कठिण परिश्रमाने आपले भवितव्य उज्वल करावे जिद्द आणि चिकाटीने दादांचा आदर्श समोर ठेवून यश मिळवावे संस्था आपल्या पाठीशी ठाम पणे उभी राहील असे सांगितले .यावेळी माजी प्राचार्य शिवाजी बागल सुधाकर कवडे यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य दादासो खरात यांनी मानले.
वसंतदादांच्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे प्रशालाचे माजी प्राचार्य हनुमंत जमदाडे संस्थेस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली .देणगीच्या ठेवीतून येणाऱ्या रकमेतून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना गुणवंत विध्यर्थी पारितोषक योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…