सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोंबलाद येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय- 50) आणि विद्या संजय हेळवार (वय- 25) या दोघी मायलेकीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिसांत झाली आहे.
जाडरबोंबलाद येथील गावाजवळ राहणारे शेतकरी आय एम पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये, म्हणून शेताच्या कडेला बायडीग तारेचे कुंपण करण्यात आले होते. सोमवारी विद्या संजय हेळवार ही विवाहितेस यांची माहिती लक्षात न आल्याने लघुशंकेला गेले असताना शेतावरून गेलेली बायडिंगची तार खाली पडल्याने विद्या हिस शॉक लागला.
त्यानंतर तीचा आवाज ऐकून आई सूवर्णा हेळवार या देखील धावत गेल्या काही सांगण्याच्या अगोदर दोघींना जबरदस्त शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद माजी सरपंच एम आर अंकलगी यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…