त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील महिलांना साडी वाटप,तर आश्रितांना मिष्टान्न

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीनदलितांच्या उद्धार कार्यास मोठा त्याग करत योगदान दिलेल्या महामाता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे महिलांना साडी वाटप तर सर्व आश्रितांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले.तर पंढरपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील स्मारक समितीस माता रमाई यांची प्रतिमा भेट देण्यात आली.   

     या उपक्रमांवेळी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तोरणे,जिल्हा संघटक अप्पासाहेब बनसोडे,वैभव भंडारे,पंढरपूर तालुकाध्यक्ष विकास गायकवाड,पंढरपूर शहराचे राजाभाऊ शिंदे, शिवाजी ओहोळ ईश्वर खंडेलवाल, रमेश स्वामी,ताःमहासचिवःसंतोष कांबळे ता सचिवःप्रकाश कांबळे,रवी सर्वगोड, ताःउपाध्यक्षःलिंगेश्वर, सरवदे ताःसंघटक सुनिल_दंदाडे,मंगळवेढा ताःअध्यक्षःअशोक माने, ताःमहासचिवःसोमा ढावरे, आठवले सर, अमोल भंडारे आदी उपस्थित होते.     

  वंचित बहुजन आघाडी पंढरपूरचे राजाभाऊ शिंदे यांनी यांच्या विशेष सहकार्य आणि संकल्पेनेतून राबिवण्यात आलेल्या या उपक्रमा बाबत मातोश्री वृद्धाश्रम येथील आश्रितानी आभार मानले.तर यावेळी बोलताना राजाभाऊ शिंदे म्हणाले विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या वंचितांच्या उद्धार कार्याच्या मागे माता रमाई यांचा मोठा त्याग होता.आणि त्यांच्या त्यागापासून प्रेरणा घेऊनच आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत. 

 

                      

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago