लग्नासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. लग्न उरकून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, या घटनेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका बालकासह सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात जाताना वाटेतच मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील बुडागवी गावाजवळ झाला आहे. याठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने इनोव्हा कारला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाची रुग्णालयात जाताना प्राणज्योत मालवली आहे.
संबंधित सर्वजण उरवाकोंडा येथील रहिवासी असून ते कर्नाटकातील बेल्लारी याठिकाणी लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न उरकल्यानंतर हे कुटुंब आपल्या इनोव्हा कारने परत आपल्या घरी परतत होतं. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात कारमधील नऊ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची ही घटना समोर येताच उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…