ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या खासदारांच्या गाडीला तुळजापूर नजीक अपघात

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खासदार निंबाळकर एका लग्न सोहळ्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी चव्हाणवाडी गावाच्या हद्दीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटर सायकलने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीला जोराची धडक दिली. सुदैवाने अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

तसंच या अपघातामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, चालक, खासदार निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक तसंच पोलीस सुरक्षा रक्षक व शिवसैनिक सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बारुळ मंगरूळ चव्हाणवाडीकडून देवकुरुळी मार्गे माळुंब्रा येथे जात असताना अचानक समोरून येणारी मोटर सायकल खासदारांच्या गाडीवर आदळली. खा. निंबाळकर यांच्या चालकाने गाडी जागेवर थांबवली. त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टाळला. मोटर सायकलस्वार जखमी झालाय.

मोटरसायकल चालकाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या गाडीमध्ये जखमीला तुळजापूर येथील सिटी स्कॅन सेंटर येथे उपचारासाठी घेऊन आले. मोटरसायकलस्वार जखमी झाला आहे.

सदर अपघातांमध्ये शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, चालक, पोलीस सुरक्षा कर्मचारी तसेच दोन पर्सनल सेक्रेटरी व शिवसैनिक सुनील जाधव या अपघातामधून बचावले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago