राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गुप्त बैठका व्हायच्या, असा धक्कादायक खुलासा अनिल देशमुख यांच्या विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी केला आहे.
रवी व्हटकर यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे दिलेल्या जबाबात अनिल परबांकडे बोट दाखवल्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री असल्याच्या काळात पोलीस बदल्यांबाबत ईडीने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले. या जबाबात रवी व्हटकर म्हणाले, अनिल देशमुख आणि अनिल परब गुप्तपणे पोलीस आयुक्तांना भेटीला बोलवायचे. तसेच परब आणि देशमुख यांच्या आयुक्तांबरोबरच्या गुप्त बैठकीत बदल्यांवर चर्चा व्हायची तर या बैठकांना मी आणि संजीव पलांडे हजर असायचो, अशी माहिती रवी व्हटकर यांनी दिली आहे.
तसेच राज्यातील मंत्री, आमदार आणि पक्षांचे नेते हे देशमुख यांच्याकडे त्यांच्याकडील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची नावे पाठवत. राष्ट्रवाई आणि काँग्रेसकडून आलेल्या याद्या माझ्याकडे यायच्या तर शिवसेनेकडील याद्या अनिल परब आणून द्यायचे, असेही व्हटकर जबाबात म्हटले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…