‘प्रोटेक्टर’ अडचणीत येणार ?
६ महिन्यात दुप्पट करून देतो या नावाखाली एका मॅकेनिकची फसवणूक केल्या प्रकरणी प्रथमेश कट्टे व शुभम कोरके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि ३५,४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला प्रथमेश कट्टे हा या बनवाबनवी प्रकरणातील प्रमुख आरोपी असून मागील जवळपास दीड वर्षांपासून ‘संकल्प’ची हंडी फुटणार अशी चर्चा होताना दिसून आली.अनेक ठेवीदार,गुंतवणूकदार प्रथमेश कट्टेच्या भरमसाठ व्याज दराच्या अमिषाला व शेअर मार्केट मनी मेकिंग च्या भुलथापाला बळी पडले असल्याचीही चर्चा होत आली.मात्र बहुतांश गुंतवणूकदार आणि लखपती बनविण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचे आश्वासन देणारा यांच्यात कायम एखादया मध्यस्थाचा दुवा ठेवण्यात आल्याचेही बोलले जाते.त्यामुळे अनेक गुंतवणूकदार हे गेल्या दीड वर्षांपासून मध्यस्थांच्या मागे हात धुवून लागल्याचीही चर्चा होताना दिसून आली.
राजेशाही थाट,लाखोंचा खर्च करून सिने कलावंतीण स्टेजवर आणि समोर तरुणाईचा जल्लोष व लाखोंच्या बक्षिसाची दहीहंडी असल्या कार्यक्रमाचा फंडा वापरत सुरुवातीच्या काळात ‘गुंतवणूक दारांवर छाप पाडण्याचा संकल्प सोडण्यात आला खरा परंतु मागील दोन वर्षांपासून पितळ उघडं पडतंय हे लक्षात येताच कट्टे हा अज्ञातवासात गेल्याची चर्चा सुरु झाली.
याच दरम्यान काही संचालकांना साऱ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने काहींनी थेट कट्टेकडे तर काहींनी थेट सोलापूर सहकार निबंधक कार्यालयात जाऊन संचालक पदाचे राजीनामे सादर केल्याचेही समजते.आता दाखल झालेला ४२० चा गुन्हा हे हिमनगाचे टोक असून केवळ ज्यांच्या मध्यस्थीने गुंतवणूक केली ते मध्यस्थ लवकरच आपले पैसे मिळतील असे आश्वासन देत आल्यानेच अनेक गुतवणूकदारांनी दोन वर्षपासून कळ काढली होती.आता पोलिसांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केल्या नंतर गुंतवणूकदार पुढे येणार का हेही पहावे लागेल. मात्र याच कालावधीत काहींनी ‘संकल्प’ला प्रोटेक्शन दिल्याने सामान्य गुंतवणूकदार हतबल ठरले आहेत,आणि या प्रोटेक्टर मंडळींचा मोठा दबदबा असल्याने हे गुंतवणूकदार तक्रारही करण्यास धजावत नव्हते या चर्चेला पहिली तक्रार दाखल झाल्याने स्वल्प विराम मिळाला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…