११ व्या पुण्यतिथी निमित्त स्व.सुधाकरपंत परिचारक बहुद्देशीय संस्थेकडून विविध विधायक उपक्रमांचे आयोजन
लोकनेते स्व.नारायणराव धोत्रे यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मी अगदी जवळून पहिली आहे. त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे कामकाज नदीकाठच्या जुन्या इमारतीमधून चालत होते.बाबा कांबळे हे प्रशासनाधिकारी होते.आणि माझ्या मते नगराध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेची कुठलाही गाजावाजा न करता अतिशय समर्पक सुरूवात जर कोणी केली असेल तर स्व.नारायणराव धोत्रे यांनी.
सर्वसामान्य नागरिक आणि नगरपालिकेचे पदाधिकारी,कर्मचारी यांच्यातील संपर्काची जी दरी होती ती खऱ्या अर्थाने त्यांनी कमी केली.शहरातील कुठल्याही भागातील अगदी अशिक्षित सामान्य नागरिकही थेट त्यांच्याकडे जाऊन आपल्या समस्या मांडत असे आणि या समस्या स्व. नारायणराव धोत्रे यांनी कधीही केवळ कागदी तक्रारीवर समजावून घेतल्या नाहीत तर थेट ज्या भागातील ज्या समस्येबाबात तक्रार घेऊन लोक आले आहेत त्यांना समवेत थेट त्या ठिकाणी जाऊन ती जागेवरच सोडविण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्भीड स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले स्व.नारायणराव धोत्रे आणखी लोकप्रिय झाले.
अनुभवातून पुढे आलेले नेतृत्व हे पुस्तकी अभ्यासापेक्षा जास्त प्रगल्भ असते याची प्रचिती स्व.नारायणराव धोत्रे यांच्यामुळे येते.पंढरपूरच्या राजकारणाबरोबरच पंढरपूरच्या समाजकारणावरही त्यांची प्रचंड पकड होती.ते स्व.कट्टर रामभक्त होते.पण आपली भक्ती त्यांनी कधी आपल्या तत्वांच्या आड येऊ दिली नाही. राममंदिर आंदोलनाचा ज्वर १९८९ ते ९२ या काळात देशभर पसरला होता पण एक रामभक्त म्हणून त्यांनी कधीही याचे राजकारण होऊ दिले नाही.ते ठणकावून सांगत राम आमच्या हृदयात आहे.देवीदेवतांच्या अनेक मंदिरांच्या उद्धारासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केली.पण राजकारणात वावरताना कधी जात धर्म पहिला नाही.
रोजगाराच्या संधी नसल्याने पंढरीत मोकळ्या जगावर खोकी टाकून छोटे व्यवसाय केले जात.अशा खोकी धारकांना लाईट कनेक्शन मिळण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून मोठा अडथळा निर्माण होत होता.पण नगराध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी याबाबत ठोस निर्णय घेतला आणि अंधार पडला कि खोके बंद करून घरी जाणाऱ्या बेरोजगार युवकांना मोठा दिलासा दिला.टिळक स्मारक रस्त्यावरील उगड्या गटारावर खोके टाकण्यास नगर पालिकेने त्यांच्याच काळात हरकत घेणे थांबविले आणि त्यामुळे या ठिकाणी शेकडो लोकांना आज रोजगार उपल्बध झाला असलयाचे दिसून येते.त्या काळात पंढरपूर शहरात नुकतेच रिक्षाचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली होती.त्या मुळे येथील पारंपरिक टांगे चालक हतबल होऊ लागले होते.त्यांनी स्व.धोत्रे यांच्याकडे धाव घेतली त्यावेळी ते अजून नगराध्यक्ष झाले नव्हते पण त्यांचा शब्द नगरपालिकेत प्रमाण मानला जाई आणि त्यामुळेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी टांगा स्टॅन्ड साठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकेवेळी ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीच्या ठिकाणी केवळ बाभळी होत्या.पण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर नगर वसविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.या ठिकाणी मुस्लिम,मागासवर्गीय आणि इतरही अल्पसंख्य समाजाचे लोक गुण्यागोविन्दाने राहतात.आज हा परिसर म्हणजे सर्वधर्म,सर्वजात समभावाचे प्रतीक आहे.आणि स्व. नारायणराव धोत्रे यांच्या अशाच निरपेक्ष समाजसेवेची दखल घेत शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते.स्व.नारायणराव धोत्रे यांचे कार्यकर्तृत्व खूप मोठे आहे.आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र माजी नगराध्यक्ष दगडूआण्णा धोत्रे व दत्तात्रय धोत्रे व सर्व नातवंडे हे स्व.नारायणराव धोत्रे यांनी दाखविलेल्या समाजसेवेच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत.
११ व्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी स्व.सुधाकरपंत परिचारक बहुद्देशीय संस्थेकडून विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…