लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना जाहिरातीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी करुन 10 हजार रुपये स्वीकारल्यानंतर साप्ताहिकाच्या संपादकास अटक करण्यात आली आहे.
जावेद शेख असे आरोपीचे नाव आहे.
‘बातमी मागची बातमी’ या साप्ताहिकाचे संपादक जावेद शेख यांनी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना ते संपादक असलेल्या साप्ताहिकासाठी जाहिरातीच्या किमतीचे दर पत्रक व्हॉट्सअपवर पाठवले. तसेच फोन करून पोलिस अधीक्षकांच्या व पोलीस खात्याचे विरोधात बदनामकारक बातम्या न छापण्यासाठी जाहिरातीच्या नावाखाली 25 हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वतः स्वीकारले. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे कलम 384, 385 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साप्ताहिकाचा संपादक जावेद शेख याला ताब्यात घेतले आहे. जावेद शेख यांच्याकडून काही वस्तूही जप्त करण्यात आल्या असून यातून काही संशयास्पद घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील हे करीत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…