शाळेतील विद्यार्थ्यांचे केस, नखे तसेच गणवेश व्वयस्थित आहे की नाही हे शिक्षकांकडून तपासण्यात येत असते. केस किंवा नखे वाढली असतील तर विद्यार्थ्यांना समज देऊन कापण्याचे सांगण्यात येते.
पण कणकवलीतील एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. कणकवलीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
मारहाणीत विद्यार्थ्याचा गाल काळा-निळा
कणकवलीतील एका इंग्रजी मीडियममध्ये पीडित विद्यार्थी इयत्ता पाचवीत शिकतो. शाळेतील शिक्षकाने या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले अशी तक्रार संबंधित मुलाच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. या मारहाणीत 5 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या गालावर मारहाणीचे व्रण दिसत असून त्याचा उजवा गाल काळा निळा पडला आहे.
शाळेने आरोप फेटाळले
तर याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित शिक्षक यांच्याकडे आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता या विद्यार्थ्याला शाळेत मारहाण झालीच नाही असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान विद्यार्थ्याच्या वडिलांनी अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराविरोधात असलेल्या नॅशनल हेल्पलाईन 1098 या चाईल्ड लाईनवर संपर्क साधून आपबिती सांगितली. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत दाखल होत त्यांच्या घरी जात मारहाण झालेला विद्यार्थ्याची विचारपूस केली.
तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती विद्यार्थी आणि त्याच्या पालकांकडून घेतली. तसेच हा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्येही जात मुख्याध्यापक तसेच संबंधित शिक्षकांकडे याबाबत चौकशी केली.
शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार
दरम्यान मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे वडील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले, 2 फेब्रुवारी रोजी शाळेत असताना सकाळी ग्राउंडवर प्रार्थना झाल्यानंतर शाळेतील शिक्षक एकनाथ धनवटे यांनी विद्यार्थ्यांचे केस आणि नखे तपासली. त्याचे केस वाढलेले दिसले म्हणून शिक्षक एकनाथ धनवटे यांनी मुलाचे केस पकडून 3 वेळा जमिनीवर आपटले. तसेच उजव्या गालावर कानाखाली हाताच्या थापटाने मारून वडिलांना सांगितल्यास आणखी मारण्याची धमकी दिली असल्याचे नमूद केले आहे.
2 वर्षांपूर्वी एकनाथ धनवटे या शिक्षकाने मुलाला मारहाण केली होती. मात्र त्यावेळी सामंजस्याने प्रकरण मिटवले होते. 2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेवरून सदर शिक्षकावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक एकनाथ धनवटे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 323, 560 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…