शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी ठोस सहकार्य केले जाईल

शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे आखणे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून कर्जपुरवठा करणे, असे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आशादायी असणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे माजी राज्यमंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे साखर कारखान्यांवर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने आकारलेला प्राप्तिकर रद्द करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला, त्याबद्दल देखील देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सदाभाऊ खोत, आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले.

केंद्रतील सरकार हे निश्चितपणाने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशिल राहिल तसेच शेती हा एक उद्योग म्हणून भरभराटीला कसा येईल या दृष्टीने हे सरकार काम करेल, असे आदरणीय मोदीजींनी अश्वस्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन कृषी विधेयक आणुन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले होते. परंतु, मूठभर लोकांनी याला विरोध केल्यामुळे ती विधेयक मागे घ्यावी लागली. परंतु माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आ. सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्याच्या समर्थनार्थ या कृषी कायद्याचे राज्यभर स्वागत करुन या कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. राज्यात या कृषी समर्थनार्थ यात्रेचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील स्वागत केले होते. जरी हि तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी देशातील शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी सर्व स्तरावरती मदत केली जाईल, असा विश्वास भेटीदरम्यान आदरणीय मोदीजींनी दाखवला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago