कर्ज-उसनवाऱ्या करून पोटच्या गोळ्याच्या उपचारासाठी तब्बल 17 लाख रुपये मोजूनही उर्वरित 9 लाखांच्या बिलासाठी बाळाला डांबून ठेवणाऱ्या खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलला चांगलाच दणका बसला आहे.
पालकाांनी कैफियत मांडताच त्याची गंभीर दखल घेत युवासैनिकांनी या रुग्णालयावर धडक देत जाब विचारला. त्यामुळे तंतरलेल्या व्यवस्थापनाने बिलासाठी अडकवून ठेवलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला अखेर डिस्चार्ज दिला आहे. इतकेच नाही तर राहिलेले 9 लाखांचे बिलदेखील माफ करायला लावल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खारघरमधील मदरहूड हॉस्पिटलमध्ये 5 महिन्यांचे बाळ जन्माला आले होते. प्रिमॅच्युअर जन्मल्यामुले त्याच्यावरील उपचार खूप गुंतागुंतीचा होता. हॉस्पिटलकडून साधारणपणे 15 लाख खर्च अपेक्षित सांगितला होता. कालांतराने उपचार चालू असताना डॉक्टरांच्या मतानुसार गुंतागुंत वाढल्याने हाच खर्च सुमारे 27 लाखाच्या जवळपास गेला.
त्यापैकी रोख रक्कम व इतर काही रक्कम कर्ज काढून आतापर्यंत 17 लाख रुपये टप्प्याटप्प्याने हॉस्पिटलमध्ये भरले होते. उर्वरित पैसे भरले नाहीत, तर डिस्चार्ज मिळणार नाही, असे सांगून हॉस्पिटलने बाळाची अडवणूक केली होती. सदर कुटुंबीय हे मूळचे कर्जत येथील रहिवासी असून ते मुस्लिम कुटुंबियांतील वासीम जालानी आहेत.
या दांम्पत्याने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तक्रार केली व मदत मागितली असता बारणे यांनी तत्काळ खारघर येथील युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांना माहिती दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…