ताज्याघडामोडी

4 मुलांच्या आईकडून 23 वर्षांनी लहान प्रियकराची हत्या; शेवटी पार्टनरचाही भांडाफोड

आरोपी महिलेला 4 मुलं आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. मृत तरुण आणि महिलेमध्ये तिच्या लिव्ह इन पार्टनरवरुन वाद झाला होता. ज्यानंतर महिलेने वीट उचलून प्रियकराच्या डोक्यात मारलं.

यात त्याचा मृत्यू झाला. ACP राजीव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार नगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ज्याचं नाव दीपक (32) असल्याचं समोर आलं आहे. डोक्यात जखमेचे व्रण दिसल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

नातेवाईकांच्या मदतीने पोलीस महिलेपर्यंत पोहोचले. शेवटी आरोपी महिलेला अटक करून तिची चौकशी करण्यात आली. तिने सांगितलं की, 26 जानेवारी रोजी ती दीपकसोबत होती. त्यावेळी लिव्ह इन पार्टनर गणेशदेखील आला होता.

त्यावेळी तिघांमध्ये वाद झाला. यानंतर गणेश निघून गेला. हे ही हिंगोलीत गर्भवती महिलेसोबत डॉक्टरचं घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी घेऊन गेला अन्… प्रियकरावर हल्ला करून झोपली, आणि… दीपकने दारूच्या नशेत मंगलावरुन गणेशसोबत वाद केला.

त्याने हातात घातलेल्या कड्याने महिलेला मारहाण केली. मंगलानेदेखील रागाच्या भरात वीट उचलून त्याच्या डोक्यावर आघात केला. यानंतर ती जवळच तयार केलेल्या झोपड्यात जाऊन झोपली. सकाळी आपल्या घरी निघून गेली.

जेव्हा तिला दीपकच्या मृत्यूची माहिती मिळाली, तर ती आपल्या चारही मुलांना सोडून बाहेर निघून गेली. पोलिसांनी जेव्हा मंगलाविषयी माहिती जमा केली तर कळालं की, मंगलाला चार मुलं आहे. तिच्या पतीच काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.

त्यानंतर ती गणेश नावाच्या तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. दोघेही मजुरी करीत होते. काही दिवसांपूर्वीच ती दीपकच्या संपर्कात आली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago