पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील अर्बन बँकेनजीक असलेल्या दहिवडकर वडा-भजी पाव सेंटर येथे भजी खरेदीसाठी गेलेल्या शंतनु धनंजय मोरे,वय-26वर्ष,धंदा-नोकरी जात-मराठा,रा-परदेशी नगर पंढरपूर या तरुणास या ठिकाणी भजी घेण्यासाठी आलेल्या २ तरुणांनी शिविगाळ करत लाथा बुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची फिर्याद सदर शंतनु धनंजय मोरे याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तर या झटापटीत फिर्यादीची सोन्याची चेन गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.नवीपेठ परिसरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दहिवडकर वडापाव सेंटर येथे असलेल्या गर्दीत धक्का लागल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा होत असून यात नेमके ठिकाणीच शहरात प्रवेश करणाऱ्या एसटी बस व प्रवाशी वाहने प्रवासी उतरविण्यासाठी थांबतात अशातच रस्त्यावर आडव्या तिडव्या लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे येथे सतत वाहतुकीची कोंडी होत असते.
येथे होणार वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने कारवाई करणे गरजचे आहे.मागील काही महिन्यात रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या म्हणून शहर वाहतूक शाखेकडून अनेक रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र अशा ठिकाणी कधी कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
या घटनेमुळे शहरात गर्दीच्या रात्रीच्या ठिकाणी वडापाव,भाजीपाव खरेदी करण्यास जाताना गर्दीत आपला कुणाला धक्का तर लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेच म्हणावे लागेल.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…