साहेबांचा आदेश आहे चोऱ्या माऱ्या होऊ लागल्यात तुम्ही दागिने घालून कशाला फिरता !

पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली परिसरात राहणारी महिला आपल्या डॉक्टर पतीसह केबीपी चौकातून बायपास रस्त्याने नातेवाईकाकडे निघालेले असता पाठीमागून दुचाकी वरून आलेले तरुणाने गाडी थांबविण्यास सांगून साहेबांचा आदेश आहे चोऱ्या माऱ्या होऊ लागल्यात असे म्हणत फिर्यादी महिलेस तुमच्या हातातील पाटल्या तुमच्या पर्स मध्ये ठेवा.

त्याप्रमाणे फिर्यादीने पाटल्या काडुन पर्स मध्ये ठेवल्या तेव्हा त्या व्यक्तीने गळ्यातील साखळीतील मंगळसुत्र काढण्यास लावले व तेसुद्दा पर्स मध्ये ठेवले असता त्याने पर्समध्ये दागिने ठेवल्याची खात्री करण्यासाठी फिर्यादीच्या हातातून पर्स घेतली व त्यास पेपर गुंडाळुन ती पर्स पुन्हा परत दिली दिली व ठीक आहे व्यवस्थित जावा असे सांगितले.

जवळच नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर फिर्यादीने पर्स उघडून पहिली असता स्टिलचे दोन कडे व एक वाळुतील दगड असल्याचे व दागिने गायब झाल्याचे दिसून आले.या प्रकरणी सदर महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सदर इसम हा 25 ते 30 वयोगटातील असुन त्याची उंची साधारन 5.6 फुट, अंगाने जाड,अंगात चाँकलेटी रंगाचा शर्ट व पँन्ट घातलेला,डोकीत हेल्मेट असलेला,रंगाने काळे सावळा असलेला इसम आहे.

सदर घटना दि-31/01/2022 रोजी सकाळी 11/20 वाचे सुमारास घडली असून या प्रकरणी पंढरपूर शहर ठाण्यात अज्ञात   25 ते 30 वयोगटातील इसमा विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago