ताज्याघडामोडी

अवघ्या ६ दिवसातच शरद पवारांची कोरोनावर मात, ट्विट करून दिली माहिती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोनामुक्त झाले असून ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. 25जानेवारी रोजी शरद पवारांना कोरोनाची लागण झाली होती आणि अवघ्या ६ दिवसातच त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. ‘माझी RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली असून मी लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि मला शुभेच्छा देणारे माझे डॉक्टर, मित्र, सहकारी आणि हितचिंतकांचा मी आभारी आहे’, असे शरद पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी होमक्वारंटाइन करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती देत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे पूर्वनियोजित 7 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र आता ते कोरोनामुक्त झाले असून लवकरच पुन्हा नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago