ताज्याघडामोडी

गांजाची शेती करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची ठाकरे सरकारकडे मागणी, E-mail करत म्हणाला…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यातच आता नांदेडच्या शेतकऱ्याने राज्य सरकारवर टीका करत गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात ईमेल केला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत चाललं आहे.

त्यात कोविड आणि काही विभागात कडाक्याची थंडी आणि गारांचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आपण सरसकट शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सरकार जर किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत असेल तर शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी द्या अशी मागणी नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

सरकारला दारू विक्रीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर गांजाच्या शेतीतूनही चांगले उत्पन्न होईल असे म्हणत नवाब मलिकांच्या जावयाने हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजा उत्पादन केलेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. खासदार चिखलीकर आज नांदेडमध्ये बोलत होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago