अनेक राज्ये किंवा प्रदेशांमध्ये सणासुदीमुळे आणि शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या फेब्रुवारीच्या सुट्ट्यांची यादीनुसार देशातील विविध भागांमध्ये काही निवडक दिवशी बँका बंद राहतील. मात्र, शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. शिवाय, बसंत पंचमी आणि गुरु रविदास जयंती या प्रसंगी देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद राहतील.
आरबीआयकडून सुट्ट्यांची विभागणी
आरबीआयने बँकेच्या सुट्ट्या तीन प्रकारात विभागल्या आहेत – निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी, रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे; आणि बँकांचे क्लोझिंग अकाउंट्स. देशाच्या विविध भागात स्थानिक सण आणि प्रसंगी बँकाही बंद राहतील. तथापि, अशा प्रसंगी देशातील सर्व बँका बंद राहणार नाहीत. उदाहरणार्थ, २ फेब्रुवारीला सोनम ल्होछारच्या निमित्ताने गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. त्याचप्रमाणे निवडक राज्यांतील बँका काही दिवस बंद राहतील तर इतर राज्यांतील बँका इतर दिवशी बंद राहतील.
फेब्रुवारी २०२२ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे –
– 2 फेब्रुवारी – सोनम ल्होछार (गंगटोक)
– 5 फेब्रुवारी – सरस्वती पूजा/श्री पंचमी/श्री पंचमी बसंत पंचमी (अगरताळा, भुवनेश्वर, कोलकाता)
– 6 फेब्रुवारी – पहिला रविवार
– 12 फेब्रुवारी – दुसरा शनिवार
– 13 फेब्रुवारी – दुसरा रविवार
– 15 फेब्रुवारी – मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौ)
– 16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती (चंदीगड)
– 18 फेब्रुवारी – डोलजात्रा (कोलकाता)
– 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर)
– 20 फेब्रुवारी – तिसरा रविवार
– 26 फेब्रुवारी – महिन्याचा चौथा शनिवार
– 27 फेब्रुवारी – चौथा रविवार
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…