ताज्याघडामोडी

नववीत शिकणाऱ्या २ विद्यार्थिनींची आत्महत्या

सातारा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. यातील एका विद्यार्थिनीने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येमागील धक्कादायक कारण उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शाहुपुरी येथे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. शाहुपुरी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या मुलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका, असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ असल्याने मी आत्महत्या करत आहे, असे तिने या चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला असून, शाहुपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने सातारा शहर परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरला आहे.

मलकापूरमध्येही मुलीची आत्महत्या

साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, कराड येथील मलकापूरमध्येही एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती. घरातील लोखंडी हुकला दोरीने तिने गळफास घेतला.

या मुलीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेचा तपास कराड पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलींनी केलेल्या या आत्महत्यांमुळे सातारा शहर आणि मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago