ताज्याघडामोडी

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

भाजपा नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नातीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या पेशाने डॉक्टर होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, ती आपला पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत राहत होती.

सौंदर्याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिच्यासोबत तिच्यासोबत काम करणारे एक डॉक्टरही राहत असल्याचं जनसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही सुसाईड नोट हाती आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजे शुक्रवारी सकाळी सौंदर्या मृतावस्थेत आढळली.

मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी सौंदर्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा हिची मुलगी होती. सौंदर्याच्या मृत्यूची बातमी कळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या कॅबिनेट सहकाऱ्यांसह येडियुरप्पा यांच्या सांत्वनासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago