टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे फोन वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा फायदा होणार आहे. ट्रायने Telecom Tariff Order, 2022 अंतर्गत घेतलेले नवीन निर्णय घेतले असून दूरसंचार कंपन्यांना आदेशही जारी केले आहेत.
या आदेशानुसार आता टेलिकॉम कंपन्यांना 28 नाही तर 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडीटी ग्राहकांना द्यावी लागणार आहे.
जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची काही दिवसांपूर्वी प्रिपेड रिचार्जच्या किंमती वाढवल्या होत्या. प्रिपेड रिचार्जमध्ये तब्बल 15 ते 20 टक्के वाढ करण्यात आली होती. यामुळे ग्राहकांनी प्रचंड नाराजगी व्यक्त केली होती. अशा स्थिथीत ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या नव्या आदेशामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
TRAI च्या आदेशानुसार दूरसंचार कंपनी किमान एक प्लॅन, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर असे ठेवेल ज्याची वैधता एक महिन्यासाठी असणार आहे. याआधी टेलिकॉम कंपन्याकडून एका महिन्याच्या नावाखाली 28 दिवसांची वैधता असलेले प्लॅन दिले जात होते.
मात्र आता ट्रायने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार प्लॅनची वैधता 28 दिवस नाही तर 30 दिवसांची असणार आहे. तसेच ग्राहकाला चालू प्लॅन पुन्हा रिचार्ज करायचा असेल तर तो सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून करू शकेल अशी तरतूद असावी असेही ट्रायने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
ग्राहकांसाठी खुशखबर
टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या नावाखाली 28 दिवसांचा प्लॅन देत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती. त्यात कंपन्यांनी प्रिपेड प्लॅनच्या किंमतीही वाढवल्याने ग्राहक नाराज झाले होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ट्रायने प्लॅनची वैधता पूर्ण 30 दिवस मिळणार आहे.
टेलिकॉम कंपन्यांची कोंडी
टेलिकॉम कंपन्या महिन्याला 2 दिवनस वाचवत होती आणि वर्षाला तब्बल 28 ते 29 दिवस कंपन्यांचा फायदा होत होता. अशा स्थितीत ग्राहकाला 12 ऐवजी 13 रिचार्ज करावे लागत होते. यामुळे कंपन्यांचा फायदा होत होता. परंतु आता ट्रायच्या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांची कोंडी झाली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…