सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केलाय.
सक्तवसुली संचलनालयाने (ED) मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना मागील वर्षी ७ डिसेंबरला सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला. यात कुंटे यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही माहिती दिलीय.
सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार, “अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवायचे. ते आपले खासगी सचिव संजीव पालंडे यांच्यामार्फत ही यादी पाठवायचे. ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळायची. मी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात काम करत असल्याने मी या यादीला नकार देऊ शकत नव्हतो.”
“अनिल देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या (PEB) सर्व सदस्यांना दाखवली जायची. या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं. यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जायची,” असंही सिताराम कुंटे यांनी सांगितलंय.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…