सांगोला: दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी महाराष्ट्र शासनाने जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा घोषित केला आहे. याचे औचित्य साधून फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, या सर्व विद्याशाखेमध्ये जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रा. सुनील नष्टे यांच्या हस्ते विद्देची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रा. सुनील नष्टे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलताना प्रा. सुनील नष्टे म्हणाले कि, भाषा ही संस्कृतिवाहक आहे. ग्रामीण भाषा ही जोपासली पाहिजे. आपल्या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे, विद्यार्थांनी आपल्या शैक्षणिक पदवीबरोबरच चांगुलपणाचेही सर्टिफिकेट मिळवले पाहिजे. माता, माती, आणि मातृभाषा हे तीन घटक आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत. मराठी भाषेमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भावना आहे. विद्यार्थांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत, कसे जगावे हे मराठी भाषा शिकविते, जगण्यातले सौन्दर्य मराठी भाषा शिकविते. असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाने स्वभाषीक असावे, माणसाने माणूसपण जपले पाहिजे.प्रत्येकाने मराठी भाषेबद्दल आदर बाळगला पाहिजे. जगातील सर्वात सुंदर भाषा हि मराठी आहे, कारण मराठीच्या प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ होतात. दोन मने जोडण्याची ताकत मराठीमध्ये आहे. मराठी भाषेत भावनेचा ओलावा असतो. मराठी भाषेचे सार व महत्व त्यांनी यावेळी विशद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन.जगताप, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संगीता खंडागळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. संगीता खंडागळे यांनी केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…