मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय.
त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवक यांनी पक्षांतर केलं. यावेळी अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
एएनआयचं ट्वीट-
याआधी माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेस सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांचे वडील आमदार रशीद शेख आणि आई महापौर ताहिरा शेख आणि काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढच नव्हे तर, रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, या कुटुंबाला आपल्याकडं खेचण्यात राष्ट्रवादीला यश आलंय.
मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागा आहेत. 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून आले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागेवर विजय मिळवला. तर, शिवसेना 12, एमआयएम 7 आणि जनता दल सेक्युरलला 7 जागा जिंकल्या होत्या.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…